Best Business Coach And Corporate Trainer In Maharashtra
27/04/2020
‘Business As-usual ’ ही परिस्थिती तशी सर्वांना आवडत असते. कुठीही विशेष घटना घडलेली नसेल, कोणतं ही संकट नसेल, अडचणी नसतील तर जीवन सुखकर असतं. व्यवसाय, नोकरी व्यवस्थित सुरू असतात, उत्पन्न नियमित असतं, स्थैर्य असतं.
परंतु असं जरी असलं तरी तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्ती, संस्था, देश – कुणाकडेही नजर टाकाल तर लक्षात येईल की यांपैकी कुणीही अश्या स्थैर्यातून पुढे आलेले नाहीत. संकटं छातीवर घेत, संकटांचं संधीत रूपांतर करत हे सर्व मोठे झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी “लोकल” उयोगधंद्याना प्रोत्साहन देण्यासाठी “व्होकल” झाले. “आत्मनिर्भर भारत”ची हाक दिली – ती अशीच कोरोना आणि चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर. समोर उभ्या असलेल्या संकटांच्या छातीवर ठामपणे पाय रोवत भारत उभा राहू पाहतोय. त्यासाठी सरकारने विविध उपाययोजना अमलात आणायचा निर्णय घेतला आहे. भारतीय उद्योजकांनी या संधीचं सोनं करायला हवं.
काय आहेत आपल्यासमोरील संधी? हा आहे धावता आढावा.
१. आत्मनिर्भर भारताची आखणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटमरनिर्भर भारताचे ५ पिलर्स उभारण्याचा निर्धार केला आहे. २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रीलियन डॉलर्सची इकॉनॉमी करणे, भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी पुढील ३ वर्षांत १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणे, टेक्नॉलॉजी आधारित २१ व्या शतकाच्या गरजा ओळखून त्या क्षेत्रात भारतीय उद्योजकांनी झेप घेण्याकडे लक्ष पुरवणे, व्हायब्रंट भारताची ऊर्जा पूर्णपणे उपयोगात आणणे आणि एकशे तीस कोटींच्या लोकसंख्येतून निर्माण होणारी महाकाय “डिमांड” पूर्ण प्रकारे वापरुन घेणे.
या पंचकलमी कार्यक्रमातून अनेक उद्योजकांनी हजारो संधी दिसून येतील. इकॉनॉमी वाढत असताना वाढणाऱ्या वस्तु आणि सेवांच्या गरजा, इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीत लागणारं मनुष्यबळ, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या सोईसुविधा...अश्या अनंत दिशांनी विविध मार्ग खुले होणार आहेत.
२. मूलभूत बदल
भारताच्या जिडीपीच्या १०% असणारं मोठं पॅकेज घोषित करून कोमेजलेल्या उद्योग जगात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या पॅकेजमध्ये लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ – या चारी गोष्टींवर भर दिला गेला आहे.
सरकारने या द्वारे व्यवसाय करण्यात येणाऱ्या अडचणी सोडवून / कमी करून अधिकाधिक उलाढाल कशी होईल याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना संकटाच्या काळात विक्रमी वेळेत होणारं पीपीई किट्सचं उत्पादन याच व्हीजनचा परिणाम म्हणून बघता येऊ शकेल.
लघु व मध्यम उद्योजकांनी या सुधारणांकडे लक्षपूर्वक बघून आपल्या व्यवसायात काय नवे अपग्रेडस करता येतील आणि मोठं मार्केट काबिज करता येईल याचा विचार करायला हवा.
3. आत्मनिर्भरतेसाठी आधार
सरकारच्या १० कोटींच्या पॅकेजमधील काही गोष्टींवर नजर टाकली तर येणारा काळ खरोखर कश्या संधी निर्माण करणारा असू शकतो याची कल्पना येऊ शकते.
सरकारने स्वदेशी ब्रँडसना जगभरात घेऊन जाण्यासाठी मदतीची तयारी केली आहे. मध्यम, लघु उद्योग इत्यादीना ३ लाखांपर्यंत विनातारण कर्ज दिलं जाणार आहे. शिवाय एक वर्ष या कर्जाचे हप्ते फेडण्याची गरज असणार नाही! MSME ना तब्बल ३ लाख कोटींची विना हमी कर्ज दिली जाणार आहेत.
या सर्व प्रयत्नांमुळे मध्यम व लघु उद्योगांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न – कॅश लिक्विडिटी – सुटणार आहे. कोरोना संकटाच्या काळात अडकलेले पैसे, बुडालेला व्यापार जोमाने उभारता व वाढवता येणार आहे.
४. आत्मनिर्भर app चॅलेंज
चीनबरोबर सुरू असलेल्या सीमा-वादाचा परिणाम म्हणून भारतीय सरकारने चीनमधील कंपन्यांचे ५९ अॅप्प्स बॅन केले आहेत. राजकारण जे काही असेल – परंतु या स्टेमुळे एक फार मोठी संधी भारतीय टेक स्टार्ट अप्स समोर उभी राहिली आहे. सोशल मीडियापासून डॉक्युमेंट स्कॅनर पर्यंत अनेक प्रकारचे अॅप्प आज लोकांना हवे आहेत. सरकारने बॅन केलेलं आहे म्हणूनच नव्हे तर भारतीय जनतेनेसुद्धा आता चीनी वस्तु-सेवांवर बहिष्काराचं अस्त्र उगारलं आहे.
याचा विचार करत सरकारने आत्मनिर्भर अॅप्प इनोवेशन चॅलेंज सुरू केलं आहे. ८ प्रकारच्या विविध अॅप्स् साठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून – प्रत्येक विभागात ३ विजेते अॅप्स निवडले जाऊन त्यांना आर्थिक परितोषिक दिलं जाणार आहे. इतकंच नव्हे, सरकारतर्फे विजेत्यांना लीडर बोर्डसवर प्रमोट देखील केलं जाणार आहे.
भारतात स्टार्ट ईकोसिस्टिम फारच मागे आहे ही फार जुनी तक्रार नेहेमीच केली जाते. सरकारच्या स्टार्ट अप इडिया, मेक इन इंडिया उपक्रमांनंतर हा आणखी एक कल्पक आणि समयोचित उपक्रम समोर आला आहे. भारतीय स्टार्ट अप इच्छुकांनी या संधीचं सोनं करायला हवं!
अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी योग्य टेंपरामेन्ट आवश्यक असतं. शिस्तबद्ध प्रयत्न करण्याची मानसिकता, आर्थिक घडी नीट बसवण्याची तयारी लागते.
“सेवाह”च्या सायन्स अँड सक्सेस (Science and Success)द्वारे उद्यमी मनांवर हेच संस्कार घडवले जातात. महत्वाची गोष्ट अशी की केवळ संस्कार करून सेवाह परिवार थांबत नाही. एक सिस्टिम लावली जाते, ज्यात एकदा तुम्ही आलात की सगळं काही घडवून घेतलं जातं! सेवाहच्या Chairperson अश्विनी धुपे ( Ashwini Dhuppe ) स्वतः गेली २० वर्षे अनेक उद्योजकांना मार्गदर्शन करत आल्या आहेत. आता तर “नवरत्न” (navratna services nashik) या सेवा अंतर्गत प्रकल्पामुळे डिजिटल मार्केटिंग पासून कंपनी नोंदणी पर्यंत सर्वच गोष्टींसाठी विश्वासाची, हक्काची माणसं मिळत आहेत.
या सर्वांचा परिपाक म्हणजे – सुरुवातीला उल्लेख झाला त्याप्रमाणे – भारत आपल्या समोरील संकटाच्या छातीवर पाय देऊन मोठी झेप मारण्यास तयार आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टीने भारताचे नियोजनबद्ध प्रयत्न होत आहेत.
आपण त्यांत सामील आहात ना?
- Team ashwinidhuppe.com
Comments (4)
Satish Naik
This blog helps us to understand what exactly the Government is planning and doing. Nicely explained in a crispy manner. Thanks, ma'am.
Milind Yeole
Very informative article which put lights on future opportunities.
Anand Odhekar
Nice explenation & elaboration of Aatmanirbhar Bharat concept 👌
Padmakar kedar
आत्मनिर्भर असणे हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून आज खुप महत्वाच आहे. सेवा टीम हे पूर्वीपासून सांगत आहे. आणि आता सरकार देखील खुप संधी उपलब्ध करुन देत आहे. नवनवीन संधी,हरी ओम🙏 धन्यवाद सेवाह 🙂 Being Atmnirbhar is todays necessity of every human beings. SEWAH team always teach us about this. The Indian government also serves more opportunities. New opportunity, Haro Om🙏 #Thanks Ashwini Man🙂 #SEWAH TEAM
Leave A Comment