blog image

व्यवसायातील स्पर्धा व त्यात टिकून राहण्याची कला : कोरोना काळातील अदृश्य संधी!

व्यवसाय म्हटला - मग तो कोणताही असो - की स्पर्धा आलीच. हाडाच्या व्यावसायिकाला स्पर्धा आवडते, हवीहवीशी वाटते. कारण स्पर्धेमुळेच आपल्या सेवा, आपलं प्रोडक्ट अधिकाधिक उत्तम, आकर्षक करत नेण्याची प्रेरणा मिळत रहाते. ग्राहकांना कायम आपल्या ब्रॅण्डशी बांधून ठेवण्यासाठी सतत सुधारणा करत राहण्याशिवाय पर्याय नसतोच. परंतु स्पर्धा असली की त्या 'लढाई' ची मजा ही औरच येते!


परंतु स्पर्धेत उतरणे, सेल्स – मार्केटिंग - प्रोडक्ट डिझाईन - सर्व्हिस सॅटिसफॅक्शन... या सर्व चक्राच्या आधी, बिझनेस फंडामेंटल्स म्हणून काही पूर्वतयारी करणं अत्यंत आवश्यक असतं. तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्या वस्तू-  सेवांच्या तोडीसतोड नसूनही, फक्त त्याचे बिझनेस फंडामेंटल्स पक्के असले आणि तुमचं नेमकं तिथेच दुर्लक्ष झालेलं असलं तर संपूर्ण डोलारा कोसळण्यास फक्त एका वाऱ्याच्या झोताची गरज असते.


स्पर्धेस घाबरणं वेगळं – स्पर्धेसाठी आवश्यक ती तयारी प्रयत्नपूर्वक करणं वेगळं! आपलं व्यवसाय उभरताना, समोर उभी असलेली वा भविष्यात उभी राहू शकणारी संभाव्य स्पर्धा यशस्वीरीत्या परतवून लावायची असेल तर व्यवसायाचे फंडामेंटल्स काळजीपूर्वक पळावे लागतातच.


या महत्वपूर्ण फंडामेन्टल  गोष्टी कोणत्या, व त्या महत्वपूर्ण का आहेत – पुढे वाचा!


१. शॉप ऍक्ट व तत्सम व्यवसाय नोंदणी : 
व्यवसायाची सुरुवात अनेकदा आपल्या घरी – मित्र / नातेवाईक यांच्यासोबत होते. सुरुवात करताना सरकारी नोंदणी वा पार्टनरशीप अग्रीमेन्ट्स अश्या कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष होतं. त्यावेळी व्यवसाय लवकरात लवकर सुरू करून चक्र फिरवण्याची घाई असते. “पुढे पाहू”, “नंतर करू” असं म्हणून चालढकल होते. परंतु नंतर व्यवसायाच्या ऑपरेशन्सची वाढ झाली, गुंतागुंत वाढत गेली की या गोष्टी कायमच्या राहून जातात. त्याची जबर किंमत पुढे मोजावी लागते!

कोरोना मुळे व्यवसाय मंदावला असेल, थांबला असेल तर ती या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपसूक मिळालेली संधी आहे असं समजा – आणि लगेचच या गोष्टींची पूर्तता करून घ्या!
 

२. ट्रेडमार्क 
व्यवसाय ही एक “मोठी” रेस आहे. महिनो न महिने, वर्षानुवर्षे मेहनत करून हे छोटं-मोठं साम्राज्य उभारलं जातं. कल्पना करा – तुम्ही अशीच मेहनत घेऊन उभारलेला व्यवसाय दुसऱ्या कुणी – खासकरून तुमच्या प्रतिस्पर्ध्याने फक्त एका कागदाच्या जोरावर हस्तगत केला तर? हो – जर तुम्ही मोठ्या मेहनतीने उभा केलेला ब्रॅंड तुमच्या नावावर ट्रेडमार्क केलेला नसेल – तर ही शक्यता नक्कीच आहे! म्हणूनच आजच ट्रेडमार्क नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करा.
 

३. लोगो 
हजार शब्द व्यक्त करू शकत नाहीत ते एक चित्र करू शकतं! नेहेमी ऐकलेलं-वाचलेलं वाक्य! पण तुमच्या व्यवसायचं गणित जमवत असताना ग्राहकांच्या मनात तुम्ही कोणतं चित्र उभारत आहात याचा विचार केला होता का? सर्व बिझनेसेसकहा काहीतरी लोगो असतो, म्हणून आपला पण हवा – बस इतकाच विचार करून लोगो तयार केला होता का? तसं असेल तर आपल्या लोगोवर शांतपणे नजर टाका. ग्राहकाच्या नजरेतून स्वतःला विचारा की यातून तुम्हाला अपेक्षित आहे ती भावना, तो संदेश पोहोचतोय का.
या निमित्ताने कोरोना काळातील निवंतपणात आपल्या बिजनेसकडे सूक्ष्म नजरेने बघण्याची संधी मिळेल – लोगो रि-डिझाईन करता करता ब्रॅंडचं भविष्य पण डिझाईन करता येईल तुम्हाला!
 

४. वेबसाईट अपडेशन
लक्षात घ्या - डिजिटल युगात तुमची वेबसाईट नसेल – तर – तुमचं व्यवसाय अस्तित्वात नसल्याजोगा आहे! लोक कोणतीही गोष्ट घेण्याचा विचार करता क्षणी “गुगल” करतात. मित्र-मैत्रिणींचे सल्ले घेतात. अश्या वेळी तुमची वेबसाईट नसेल तर ग्राहकांच्या नजरेत येण्याची संधी १००% गमावून बसलेली असते.
अनेक व्यावसाईक आपली वेबसाईट तयार करतात खरं, पण फक्त फॉर्मलीती म्हणून! अगदी लोगो सारखी! त्यावर काय लिहिलं आहे, जे लिहिलं आहे ते ग्राहकांना आकर्षित करणारं, आवश्यक व योग्य ती माहिती देणारं आहे का – हा सर्व विचार त्या मागे अजिबात नसतो. तो करणं अत्यंत आवश्यक आहे.
लॉक डाऊन – ही या अतिशय गंभीर व्यावसाईक अपंगत्वावर मात करण्याची सुवर्णसंधी आहे. ती चुकूनही सोडू नका!

५. सेल्स फनेल अपडेशन
सेवाह तर्फे अनेक व्यावसाईकांचं मेंटरिंग केलं जातं. बहुतेक मराठी उद्योजकांचा सर्वात मोठा वीक-पॉईंट म्हणजे मार्केटिंग आणि सेल्स! जणू विक्री करणे व विक्रीसाठी विविध युक्ति वापरणे म्हणजे “फसवणूक” असते असे काहीतरी समज मराठी उद्योजकांत रुजलेले आहेत. हे समज दूर सारून, आपल्या टार्गेट कस्टमरला आकर्षित करण्यासाठी कोणकोणत्या कृती कराव्या लागतील – त्यांची एकसंध साखळी कशी आखता येईल यावर अतिशय गांभीर्याने विचार करणे प्रत्येक उद्योजकासाठी अत्यंत आवश्यक आहे.

विश्वास ठेवा – या ५ गोष्टींवर घेतलेली मेहनत तुमच्या व्यवसायाला झळाळतं यश देऊन जाईल!

या सगळ्या गोष्टी कश्या कराव्यात, या करताना कोणती खबरदारी घ्यावी - हे सगळं अनुभवी मेन्टर्सकडून शिकून घेणं अतिशय आवश्यक आहे. "सेवाह" परिवारातर्फे घेतल्या जाणाऱ्या सायन्स अँड सक्सेस या प्रोग्रॅममध्ये हे सर्व सखोल शिकवलं, चर्चिलं जातं. सेवाहच्या चेअरपर्सन, सौ अश्विनी धुपे - स्वतः २ दशकांपासून विविध उद्योजकांच्या मेन्टॉर राहिल्या आहेत. इतकंच नव्हे, तर या सर्व सर्व्हिसेस एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने सेवाह ने "नवरत्न सर्व्हिसेस" (Navratna services) नावाची एक कंपनी देखील स्थापन केली आहे, ज्याद्वारे नवीन व्यवसायांच्या एन्ड टू एन्ड गरजा भागवल्या जातात!

सध्या कोव्हिड १९ मुळे संपूर्ण जगाचा व्यापार – व्यवहार जागच्या जागी थिजल्यासारखा झालेला आहे. अनेकांना हे एक मोठं संकट वाटत आहे. परंतु सेवाह च्या प्रोग्राम्समधून शिकून गेलेले उद्योजक या संकटाला संधीसारखं वापरत आहेत. आपल्याला व्यवसायाला अधिकाधिक “कॉम्पिटिशन प्रूफ” करण्याकडे लक्ष पुरवत आहेत. आपले बिझनेस फंडामेंटल्स अधिक मजबूत करत आहेत.
 

हा काळ सर्वच उद्योजकांनी वापरायला हवा. व्यवसायाच्या पायाची डागडुजी करायला हवी, व्यवसाय अधिक मजबूत करायला हवा. सेवाह कुटुंबाचे सदस्य हेच करत आहेत! कारण समोर उभ्या असलेल्या प्रत्येक परिस्थितीचं संधीत रूपांतर करण्याचं प्रशिक्षण मिळालं आहे त्यांना! आणि म्हणूनच – सेवाह सदस्य प्रत्येक स्तरावरील स्पर्धेत अव्वल राहिले आहेत!
- www.ashwinidhuppe.com

Leave A Comment