blog image

आयुष्य परिपूर्ण करणारी भारतीय कुटुंबपद्धती!

सुखी माणसाच्या सदऱ्याची कथा सर्वांना माहितीये.
आटपाट नगरातला राजा सतत बेचैन असतो, दुखी असतो. सर्व सुखं पायाशी लोळण घेत असूनही समाधानी नसतो. एक साधू सांगतात की सुखी माणसाचा सदरा घातला तर राजाची समस्या मिटेल. राजाचे शिपाई अख्ख्या राज्यात फिरतात. कुणी सुखी नसतो, प्रत्येकजण काही ना काही तक्रारी सांगतो. शेवटी, एका तळ्यात पाय बुडवून निवांत बसलेला, एक माणूस सापडतो. सेवक विचारतात, का रे, तू सुखी आहेस का? तो म्हणतो, “हो तर! मला कसली चिंता? मी अगदी सुखी आहे!” राजाचे सेवक आनंदाने त्याला सदरा मागणार – इतक्यात त्यांच्या लक्षात येतं की या माणसाच्या अंगावर सदराच नाही! अनौपचारिक भाषेत ज्याला “फटीचर” म्हणतात – असा तो माणूस असतो!
धडा काय? तर सुख “आपल्या” मानण्यावर आहे! या कथेचा आपल्या आजच्या – भारतीय कुटुंबपद्धतीशी – विषयाशी काय संबंध? खूपच घनिष्ट संबंध आहे!

एकच नव्हे – दोन संबंध आहेत! आजी-आजोबांबरोबर राहाणाऱ्या पिढीने वरील कथा युट्यूबवर बघितलेली, ऐकलेली वा कुठल्या रंगीबेरंगी चित्रांच्या पुस्तकात वाचलेली नाही. आजी-आजोबांच्या कुशीत विसावून अनुभवलेली आहे. ज्यांच्या बालपणी चंपक, अमरचित्रकथा, चांदोबा सारखी निर्भेळ आनंदाची साधनं होती त्यांनासुद्धा शेवटी खरा विसावा याच मायेच्या ऊबीतून मिळायचा.

मोठे झाल्यावर, जगातील विविध संकटं अंगावर झेलताना, कठीण प्रसंगातून जाताना या सुखी माणसाच्या सदऱ्याने ती ऊब मिळवून दिली आहे कित्येकाना. नोकरीत हवी तशी प्रगती होत नसेल, व्यवसायात मोठं अपयश येत असेल तर कळत नकळत याच कौटुंबिक बंधनांनी मानसिक शक्ती बांधून ठेवली आहे. 
ही आहे भारतीय कुटुंबपद्धतीची खरी शक्ती. आजी-आजोबाच नव्हे, माता-पित्याबरोबर असलेला संवाद, बहीण-भावांशी असलेला बंध भारतीय मनाच्या अस्तित्वाची खूण असते. त्याशिवाय आपलं अस्तित्व हरवल्यासारखं होतं. आनंदाच्या क्षणी, संकटाच्या प्रसंगी “बाकी सगळं विसरून” एकत्र येणारं कुटुंब संपूर्ण भारताची खरी शक्ती आहे.

आपल्या कर्तृत्वाच्या वृक्षाच्या मुळाशी हेच कुटुंब असतं. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे उभ्या रहाणाऱ्या विविध समस्या हीच मुळं नाजुक झाल्याचे परिणाम आहेत. इथेच आहे आपल्या आजच्या विषयाचा – त्या सुखी माणसाच्या सदऱ्याशी असलेला दूसरा संबंध.

पाश्चात्य देशात रुजलेला “मानसोपचार” हा वैद्यकीय प्रकार भारतात हाहा म्हणता रूजला, वाढला, सर्वत्र पसरला. कारण आपल्या मनाच्या तळाशी असलेला दुखाचा, निराशेचा गाळ उपसून काढणारी भारतीय कुटुंबपद्धती नावाची मशिनच बंद पडल्यागत झालीये.

“वदनी कवळ घेता...” असो वा “रामकृष्णहरी” असो – असं काहीतरी म्हणत, परमात्म्याचं स्मरण करत, “ह्या आजच्या न्याहारीसाठी कृतज्ञता” बाळगत, रात्री एकत्र बसून जेवणे – हा भारतीय कुटुंबपद्धतीचा जुना संस्कार आहे.

वरकरणी पहाता अगदीच साधा, "चांगला ही नाही वाईटही नाही" असा हा संस्कार. पण ते एकत्रित, सर्वांनी मिळून केलेलं जेवण कितीतरी मोठी मानसिक शक्ती मिळवून देत असतं.

मी आज दिवसभर जो काही जगाशी लढलो आहे, जी कुठली संकटं उरावर झेलली आहेत, ज्या कोणत्या कटकटी सहन केल्या आहेत – त्या सर्वांचा अर्थ – या एकत्र जेवण्यात लागतो. “ह्या लोकांसाठी आणि ह्या लोकांच्याच बळावर” सर्व युद्ध लढली आहेत व यापुढे ही लढणार आहे – याचं कळत-नकळत भान येतं. “मी का जगतोय?” – असा प्रश्न थेट निकालात काढणारी अतिशय परिणमकारक प्रक्रिया आहे ही!

आणि, सर्वात महत्वाचं – तिकडे रणांगणात काहीही होवो, मी जिंकलो काय, हारलो काय – शेवटी “हे लोक आहेत” ... आणि हे लोक जोपर्यंत आहेत तो पर्यंत मी सुखी आहे, सुरक्षित आहेत, एकटा नाहीये – हा आधार, हा दिलासा मिळतो. भारतीय कुटुंब व्यवस्थेचं हेच सर्वात मोठं बलस्थान आहे.

या व्यवस्थेला अत्यंत गांभीर्याने घेऊन, भारतीय मनाची ही गरज ओळखूनच सेवाहचा सायन्स अँड सक्सेस हा कोर्स तयार केला गेला आहे. या कोर्समध्ये आपली नाती अधिक घट्ट करणे, आहेत त्या जवळीकतेला उजाळा देणे – हे सगळं फार परिणामकारकतेने घडवून आणलं जातं. आपल्या “रिलेशनशिप्स” वरील सेशनमध्ये सौ अश्विनी धुपे जी काही जादू घडवून आणतात तो अनेकांसाठी कायमस्वरूपी लक्षात रहाणारा अनुभव असतो. अर्थात, अश्विनी धुपेंसारख्या महाराष्टातील नंबर १ मराठी रिलेशनशिप कौन्सिलर स्वतः मार्गदर्शन करणार म्हटल्यावर मॅजिक घडणारच...नाही का?!

कुटुंबाला अधिकाधिक जवळ आणून नात्यांची वीण घट्ट करणे, भारतीय कुटुंबव्यवस्थेला अजून सशक्त करणे – हे मुळात “सेवाह”च्या मूलभूत तत्वांमध्येच समाविष्ट केलेलं आहे. कारण यश कसं मिळवायचं – श्रीमंत कसं व्हायचं – बिझनेसमध्ये प्रगती कशी साधायची यावर भरपूर लिहिलं, बोललं जातं.

पण हे सगळं “कशासाठी” करायचं – याचं उत्तर मात्र एकच असतं! “आपल्या लोकांना सुखी ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी!” आपल्या ध्येयाला दिशा देणारी, जीवनाला परिपूर्णत्व देणारी ही व्यवस्था आहे. भारतीय कुटुंबपद्धती - हाच तो सुखी माणसाचा सदरा आहे!  आणि - या व्यवस्थेच्या सक्षमीकरणात सेवाह परिवार खारीचा वाटा उचलत आहे, याचा आम्हा सर्वांना सविनय, पण सार्थ अभिमान आहे!
 

Comments (6)
profile image
Shashikant

खूप छान विवेचन

Reply
profile image
Dr Vishal Bothikar

Great ... thanks for showing v important angle of our family system....I hv never thought about it like this

Reply
profile image
Raju Chaudhari

खरच खुप छान माहिती

Reply
profile image
Ashwini Lavande

SEWAH education hub is one of the best education hub. I am very lucky because of part of SEWAH. Ashwini Mam you are great life and business Coach you are great mentor. This is very nice article. Thank you ma'am.

Reply
profile image
Sunita Rana

Very useful Article

Reply
profile image
Yogesh Kapse

Nice lines

Reply
Leave A Comment