Best Business Coach And Corporate Trainer In Maharashtra
27/04/2020
जगभरात कोव्हिड१९ साथीने हाहाकार माजवला आहे. अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. कित्येक स्टार्टअप्सने गाशा गुंडाळला आहे. छोट्या कंपनी असो वा महाकाय कॉन्ग्लोमरेट्स – सर्वांनी आपापल्या आर्थिक स्थितीचा धांडोळा घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामस्वरूप नोकऱ्या कपात, पगार कपात, पगारवाढी रद्द होणे, वर्क फ्रॉम होम अश्या अनेक गोष्टी वेगाने वळणं घेत आहेत. साहजिकच, सर्वत्र असुरक्षिततेचं आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. परंतु प्रत्येक अनिश्चितता “वाईट”च असते असं नव्हे!
कोव्हिडमुळे जगभरातील व्यवसायांचे कच्चे दुवे उघड झाले आहेत. चीनवर अख्ख्या जगाचं अवलंबत्व किती अवाढव्य स्वरूपाचं होऊन बसलं आहे आणि त्याचे धोके काय आहेत – हे या निमित्ताने संपूर्ण जगाला उमगलं आहे. इथेच वर्तमान अनिश्चितता अनेक संधी घेऊन समोर उभी रहाते.
या संधी नेमक्या काय असू शकतात याचा विचार केल्यास पुढील ४ गोष्टी लक्षात येतात.
१. चीनला मागे टाकणे :
जगभराने उघड वा छुप्या प्रकारे चीनवरील आपलं अवलंबत्व कमी करण्याचा चंग बांधला आहे. भारताने देखील “आत्मनिर्भर”ते कडे झेप घेण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी योजना, निधींची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय होतकरू नव-उद्योजकांसमोर काही अश्या प्रकारचे उद्योग नक्कीच एक उत्तम पर्याय म्हणून उभे आहेत.
खेळण्या : भारतच नव्हे, जगभरात खेळणी उत्पादनात चीन ने मोठं मार्केट काबिज केलं आहे.
सजावटीचं सामान : भारतातील उत्सवप्रियता खरं तर आपली मोठी शक्ति आहे. सण-उत्सवात मोठ्या संख्येने भारतीय जनता घराबाहेर पडते, खरेदी करते. भारतीय अर्थव्यवस्थेचं चक्र फिरवण्यात उत्सवांचा मोठा हातभार लागतो. परंतु या चक्रात चीन च्या वस्तूंनी मुसंडी मारली आहे. सजावटीचं समान, आरास, रोषणाई – या सर्व वस्तु बहुतांश चीनवरुन आयात केलेल्या असतात. आत्मनिर्भरतेकडे जायचं असेल तर या वस्तूंना भारतीय पर्याय निर्माण झाल्याशिवाय गत्यंतर नाही!
प्लॅस्टिक वस्तु : खेळण्याप्रमाणेच हे मार्केट, चीनने जगभर पादाक्रांत केलेलं आहे. या क्षेत्रात भारतीय उद्योजकांना चांगल्या संधी आहेत.
खतं – रसायनं : शेतीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या भारताने इतकी वर्षे खतांसाठी व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या रसायनांसाठी चीनवर मदार सोडली होती हे अनेकांना खरं वाटणार नाही. परंतु हे सत्य आहे. शेतीसाठी, भारतीय शेतकऱ्यांसाठी काही करण्याची इच्छा असणाऱ्यांना “सोशल एन्टरप्राईज” तयार करण्यासाठी हे क्षेत्र उत्तम आहे. त्यात भारतीय जैविक शेतीचा मिलाफ करून अभिनव प्रयोग केले जाऊ शकतात.
२. पारंपरिक व्यवसायांमधील डिजिटल संधी
भारतच नव्हे, जगभरात उद्योग-व्यवसाय चालवण्याच्या काही जुन्या पद्धती आजपर्यंत रूढ होत्या. क्लायंटना भेटणे, वस्तूंची डिलिव्हरी, मार्केटिंग-कस्टमर सपोर्टच्या पद्धती.. या सर्वांचे काही ठोस मॉडेल होते जे कित्येक वर्ष कटाक्षाने, काटेकोरपणे पाळले जात असत. कोव्हिड१९ मूळे मात्र हे सगळं एका झटक्यात बदललं.
आता संपूर्ण ऑफिस घरून काम करत आहे. एकत्रित आपापल्या घरून ग्राहकाशी ग्रुप/कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करत आहेत. डिजिटल मध्यमांमधून प्रेझेन्टेशन्स होत आहेत, सेवा पुरवल्या जात आहेत. वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी नवनवे पर्याय शोधले जात आहेत. त्या पर्यायांच्या ट्रॅकिंगसाठी स्वातंत्र्य व्यवस्था निर्माण होत आहेत. या मुळे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये विविध “डिजिटल” संधी निर्माण होत आहेत. त्यातून अनेक नवे. कल्पक उद्योग पुढे येणार आहेत. नव-उद्योजकांसाठी या उत्तम संधी असणार आहेत.
३. नव्या व्यवसायांची दालनं
प्रस्थापित उद्योगांमध्ये डिजिटल इनोवेशन्स हा पर्याय उपलब्ध असतानाच – नव्याच सेवा-सुविधाना देखील मोठा वाव आहे. उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांति घडत असताना त्यात नवे प्रयोग, नवे सोल्यूशन्स तयार होण्याला पर्याय नाहीच! उद्योजकांनी सर्वत्र लक्ष ठेवून अश्या संधी शोधून त्यातून कल्पक उद्योगनिर्मितीचा ध्यास घ्यायला हवा.
४. इतर देशांमधून चीनला हद्दपार करण्याच्या संधी
पहिल्या मुद्यात भारतात कोणकोणत्या चीनी मालाला हद्दपार करण्याची संधी आहे हे आपण बघितलं. या उलट, चीनवरील अवलंबत्व कमी करण्याची इतर देशांची इच्छा – हा देखील भारतीय उद्योजकांसाठी एका मोठ्या संधीच्या खजिन्यासारखा असलेला पर्याय आहे. त्यांना आपण पर्याय म्हणून सामोरे गेलो, तर भारताची विश्वासार्हता, नैतिक व्यवसायांचा इतिहास पहाता आपल्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो.
थोडक्यात, “मेड इन चायना”ला “मेड इन इंडिया” होतानाच्या संधी वरील चतु:सूत्रित गुंफलेल्या आहेत. उद्योजकांनी चौफेर नजर फिरवत आपल्याला योग्य वाटेल ते सूत्र अवलंबून उत्तम ती संधी हस्तगत करायला हवी!
या कार्यात “सेवाह” परिवार प्रत्येक भारतीय उद्योजकाच्या सोबत उभा आहे. सौ अश्विनी धुपे, यांनी आपल्या काही दशकांच्या अनुभवाच्या जोरावर अनेक उद्योजकांना अश्याच संधी सोन्यात रूपांतरित करण्यात मदत केली आहे. “सेवाह” च्या “सायन्स अँड सक्सेस” प्रोग्राममधील शिस्तबद्ध आराखडा काटेकोरपणे पाळला गेला तर भव्य उद्योगनिर्मिती यशस्वी होऊ शकते हे कित्येक उदाहरणांवरून सिद्ध झालेलं आहे. शिवाय “नवरत्न” या सर्वप्रकरच्या बिझनेस सर्व्हिसेस देणाऱ्या सेवाहच्याच नव्या उपक्रमामुळे बिझनेस उभरण्यातील बहुतांश ऑपरेशनल अडचणीदेखील आता जलद गतीने सोडवण्यात “सेवाह” परिवार जोमाने पुढे सरसावत आहे.
गरज आहे, ती फक्त उद्योजकांनी कृती करण्याची!
Comments (5)
Ashish Dharane
Well explained article. surely give idea to upcoming businessmen to start with......
Prashant aware
Will ,have a meet madam i am having new business idea .Want ur tech & mental support.
Ajay Pratapsing Patil
खरोखर अतिशय छान पद्धतीने आपण सत्य परिस्थिती सांगीतली.तसेच व्यावसायिकांना संधी कशी दरवाजा ठोठावते आहे हे पण सांगीतले आणि मार्गदर्शन देखील केलं...
Narendra Mahajan
I am always with my,AASHU DIDI.She is my MENTOR. I will meet her very soon to discuss so many things 😊
Padmakar Kedar
This is golden opportunity to everyone.. true explanation, very realistic. Thank you so much Mam.
Leave A Comment