blog image

सुशांतसिंग राजपूतची दुर्दैवी आत्महत्या आपल्याला ६ गंभीर धोक्यांची जाणीव करून देत आहे

२०२० वर्ष एकामागे एक आव्हानं घेऊन येतंय. आर्थिक मंदी, कोरोना, वादळ...“हे वर्ष लवकर संपू दे बाबा!” अश्या अर्थाच्या पोस्ट - विनोद सोशल मीडियावर केले जात आहेत. अश्याच वातावरणात लोकप्रिय, तरुण अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी आली. सर्व स्तरावर हळहळ व्यक्त होत आहे. सुशांत तरुण होता, चांगला अभिनेता होता...अल्पावधीत त्याने बॉलीवूडमध्ये आपलं अस्तित्व दाखवून दिलं होतं. त्यामुळे त्याच्यासारख्या व्यक्तीने असा निर्णय घ्यावा याचा अर्थातच अनेकांना धक्का बसला, वाईट वाटलं.
डिप्रेशनमुळे असं टोकाचं पाऊल उचलणं सुशांतसिंग ला योग्य वाटलं असावं. परंतु आपण शांतपणे विचार केला तर असे अनेक अज्ञात, अदृश्य सुशांतसिंग आहेत. वरवर हसत आहेत, आपलं काम करताहेत – पण मनात खोलवर कोणतं दुःख, निराशा दडवून बसले आहेत याची आपल्याला पुसटशीदेखील कल्पना नाही. हे सगळं आपल्या बदलत्या सामाजिक वातावरणामुळे होत आहे.

सुशांतसिंगच्या आत्महत्येवरुन आपल्या समाजात उभ्या राहिलेल्या पुढील गंभीर धोक्यांची जाणीव आपण करून घेणं आवश्यक आहे.

१ – मनमोकळं नं करणे
एकत्र कुटुंब पद्धत मोडकळीस आली आहे, सणवार एकत्र साजरे करणं कमी होत आहे. या मुळे माणूस अधिकाधिक कोशात जात आहे. मनातील दुःख, निराशा व्यक्त करायला संधीच मिळत नाहीये. अश्याने मळभ साचत जातात, प्रेशर वाढत जातं आणि एक दिवस कडेलोट होतो!

२ – अपेक्षाभंग पचवण्याच्या मानसिक शक्तीचा अभाव
करियरमध्ये अपयशी होणं, जवळच्या माणसांकडून अपेक्षित प्रतिसाद नं मिळणं, प्रेमभंग... ही बहुतेक तरुणांच्या दुःखाची कारणं आहेत. दहावी-बारावीत मार्क्स कमी मिळाले, नापास झाले म्हणून आत्महत्या केली – अश्या बातम्या नेहेमी वाचतो आपण. याचाच अर्थ अपेक्षाभंगाचं दुःख पचवण्याची मानसिक क्षमता तयारच होत नाहीये आपल्यात!
वाढत्या वयात ही तयारी होणं आवश्यक असतं. एकीकडे हट्टाने पेटून हवं ते “पाहिजेच” असा दुराग्रह बाळगणे आणि दुसरीकडे गोष्टी मनाजोगत्या घडल्या नाहीत तर जीव फेकून देणे – दोन्हीही टाळण्याचे संस्कार होणं आवश्यक आहे.

३ – सबसे बुरा रोग...क्या कहेंगे लोग!
“लोक काय म्हणतील” या एकाच प्रेशरमुळे कित्येकांनी आपल्या स्वप्नांचा चुराडा करून, नंतर आयुष्यभर “...तर काय घडलं असतं” या कल्पनेत जीवन व्यतीत केलं आहे. आपली स्वप्नं गाठण्यासाठी कष्ट उपसताना – वा – स्वप्न साध्य करण्यात कमी पडलोच तर ते “मान्य करून” जगताना – लोक काय म्हणतील / म्हणत असतील हे दडपण घेऊनये. चुका मान्य करणे, त्यातून शिकणे – अत्यंत आवश्यक आहे. परंतु ते स्वतःसाठी – स्वतःचा विकास व्हावा म्हणून. लोकांचं, बदनामीचं प्रेशर घेणं अगदीच चूक आहे.

४ – व्यक्त होण्यास पोषक वातावरणाचा अभाव
आपल्या समाजात “कर्तृत्व” असण्याच्या विचित्र संकल्पना रुजल्या आहेत. पुरुषाने रडू नये, बाईने “ऍडजस्ट करावं” असे विविध अपेक्षांचे डोंगर उभारले गेले आहेत. या डोंगरांचं ओझं घेऊन आपण सगळे जगत आहोत.

किती पेलणार ना हे ओझं? शेवटी त्याखाली दडपून जाणारच!

सुशांतसिंग हा एक तरुण उदाहरण म्हणून समोर आहे आज...पण आजूबाजूला अश्या नसत्या दडपणाखाली पिचलेले कित्येक लोक आहेत. फक्त कुठेच मोकळं होता येत नाही, मनातली घुसमट व्यक्त करता येत नाही म्हणून जीव मुठीत धरून जगणारे आणि दुःखाचा कडेलोट झाल्यावर आत्महत्या करणारे लोक  आहे.
फक्त “मोकळं बोलता यावं” ही अपेक्षा आहे यात! आपल्याकडे तेवढं देखील साध्य होत नसेल, तर तो केवढा मोठा सामाजिक दोष आहे, नाही का?!

५ – अनाठायी जबाबदरी
कधीकधी आपल्यातील सुप्त अहंकार आपल्यासमोर नसतं संकट घेऊन उभा रहातो. “माझ्यावर माझं कुटुंब अवलंबून आहे” – हे जबाबदरीचं भान म्हणून योग्य व आवश्यकच आहे. परंतु त्याचा अतिरेक झाल्याने अनावश्यक anxieties ना निमंत्रण मिळतं. मूल लहानाचं मोठं झालं आहे, आता ते स्वतंत्र आहे – हे कित्येक पालकांना शेवटपर्यंत मान्य नसतं. आपली पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ती स्वतः स्वतःची काळजी घेऊ शकते – हा विश्वास कित्येक पुरुषांना नसतो. यामुळे अनावश्यक जबाबदाऱ्या अंगावर ओढवल्या जातात. त्यातून निर्माण होणारा दबाव जीवघेणा ठरू शकतो.

६ – “आपलं माणूस!” नसणं
आजचा माणूस “गर्दीत एकटा” पडलेल्या अवस्थेत जगतोय. फेसबुकवर शेकडो मित्र आहेत, Instagram वर फोटोजना हजारोंनी लव्ह येतात...पण रात्री झोपताना एकटंच वाटतं! मनातील दुःख सोडाच – यशाचा आनंद साजरा करण्यासाठी देखील कुणी नाहीये – अशी अनेकांची परिस्थिती आहे.
अश्या अवस्थेत मानसिक तणाव हलका कुठे करावा? बदलत्या सोशल स्ट्रक्चरमुळे अश्या विचित्र समस्या समोर उभ्या रहात आहेत... सुशांतसिंग राजपूत त्याच समस्यांचा बळी आहे.

“सेवाह” च्या उपक्रमाद्वारे हे सर्व बदलण्याचा प्रयत्न होत आहे. चेअपर्सन सौ अश्विनी धुपे आपल्या विविध प्रोग्राम्सद्वारे भावनिक, आर्थिक, सामाजिक जाणिवा समृद्ध करत आहेत. व्यावसाईक यशाचे फंडामेंटल्स मजबूत करत आहेत.

पुन्हा एक सुशांत घडू नये हीच सेवाहची मनस्वी कळकळ आहे.

समाज म्हणून आपली सर्वांची ही जबाबदरीच आहे, नाही का?

- Team ashwinidhupppe.com

Comments (5)
profile image
Vrushali

Very well said mam we have to focus on this 6 topics , n improve one n one person ..... everyone is suffering from lots of issues , we should find the right solution on that problem

Reply
profile image
Milind Yeole

Amasing and very useful article!!!

Reply
profile image
Balaji Bhawankar

Great, supperb

Reply
profile image
Yogesh Kapse

I’m thankful for all that you do. Thank you so much mam.

Reply
profile image
Mitesh Rajput

Thanks for this blog

Reply
Leave A Comment