blog image

लॉकडाऊन अवस्थेतून वेगवान वाढीच्या अवस्थेत जाण्याच्या ५ टिप्स

जगभरातील व्यवसाय कोविड-१९ च्या विळख्यात अडकून पडले आहेत. जागच्या जागी थांबले आहेत, थिजले आहेत. अनेकांना आपल्या वस्तु-सेवा पुरवण्यासाठी आपली टीम उपलब्ध होऊ शकत नाहीये. काहींना वस्तु-सेवा पुरवता येऊ शकतात पण ग्राहकच उपलब्ध नाहीत! कपडे विकणाऱ्या दुकानदारांपासून अमेरिकेतील क्लायंटला आयटी सुविधा पुरवणाऱ्या कंपनीपर्यंत अनेक बिझनेसेस वेगवेगळ्या समस्यांशी लढत आहेत. पण म्हणतात ना, अडचणीच्या धोंड्याचा पायरीसारखा वापर करता आला तरच यशाची शिखरं गाठता येतात!

आज अश्याच अडचणींचे धोंडे पडलेले असताना त्यांच्या पायऱ्या करायच्या की अडचणींसमोर हतबल होऊन हार मानायची हा निर्णय घेण्याची वेळ बिझनेस ओनर्ससमोर आली आहे. “थांबलेला” व्यवसाय काही काळानंतर झेप घेऊन पुढे नेता येऊ शकतो. फक्त त्यासाठी तशी तयारी करावी लागते. लॉकडाऊन अशी तयारी करण्यासाठी उत्तम संधी आहे.

काय तयारी करावी? वाचा वेगवान वाढीच्या अवस्थेत जाण्याच्या ५ टिप्स!

१. इंडस्ट्रीचा अभ्यास
रोजच्या ऑपरेशन्समध्ये अनेकदा आपण आहोत त्या व्यवसायात नवीन काय बदल घडत आहेत, नवे कोणकोणते प्रयोग होताहेत यांचा अभ्यास करण्याची पुरेशी संधी मिळत नाही. ग्लोबलायझेशनच्या युगात चीन असो वा दक्षिण आफ्रिका – कुठेही घडणारे छोटे मोठे बदल आपल्या व्यवसायावर दूरगामी परिणाम घडवून आणू शकतात. ओला-उबर सारख्या इनोवेशन्स मुळे पब्लिक ट्रान्सपोरटेशन आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत अनेक बदल घडल्याचं आपण अनुभवलं आहेच.

असे कोणते बदल तुमच्या इंडस्ट्रीत घडत आहेत? त्यांतून तुम्हाला कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात? अश्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी हा वेळ आवर्जून वापरा.

२. मार्केटिंगची तयारी
ग्राहकांनी तुमच्या वस्तु – सेवा का विकत घ्याव्यात ? – या प्रश्नाचं उत्तर जितकं स्पष्टपणे आणि मोजक्याच शब्दांत देता येईल तितका तुमचा व्यवसाय अधिक यशस्वी होईल. हे उत्तर देता येणे – म्हणजेच उत्तम मार्केटिंग करणे!
परंतु त्यासाठी आपल्या व्यवसायाची, आपल्या ब्रॅंडची, आपण नेमक्या कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना आकर्षित करू शकतो – करायला हवं – करत आहोत : या मॅट्रीक्सवर मेहनत घेऊन त्यानुसार आखणी करावी लागते. त्यासाठी शिस्तबद्ध स्ट्रॅटेजी आणि लॉन्ग टर्म प्लॅनिंग आवश्यक असतं. ते करण्यासाठी पुरेसा वेळ लागतो. मानसिक शांतता देखील आवश्यक असते.

सध्या लॉकडाऊनमुळे वेळ आणि शांतता – दोन्हीही अगदी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत! म्हणूनच स्ट्रॅटेजी आणि लॉन्ग टर्म प्लॅनिंगसाठी हा वेळ अतिशय उपयुक्त आहे. उद्योजकांनी या संधीचं सोनं केलं तर त्यांच्या बिझनेसवर दूरगामी सकारात्मक परिणाम निश्चितच घडवून आणता येऊ शकतात.

३. कॉम्पिटिशन अनालिसिस
स्पर्धेत सर्वांनाच अव्वल राहायचं असतं. व्यवसायात तर लीडिंग प्लेयर असण्याचे अगणित फायदे असतात. परंतु अशी बिझनेस लीड आपोआप मिळत नाही. आपण आपल्या वस्तु-सेवा उत्तम देणे, योग्य कस्टमर सपोर्ट देणे आणि आपल्या व्यवसायाला आवश्यक असलेल्या सर्व पूरक गोष्टी करणे आवश्यक असतंच. परंतु आपले प्रतिस्पर्धी नेमके काय करत आहेत, त्यांचा मार्केट शेयर कसा आहे, त्यात कुठे कुठे वाढ होत आहे, कुठे कुठे उतरंड येत आहे – त्यामागची कारणं काय आहेत - यावर सतत नजर ठेवावी लागते. त्यानुसार आपल्या व्यवसायाला दिशा द्यावी लागते.

कोव्हिड १९ स्वतः एक प्रतिस्पर्धी म्हणून समोर उभा आहे. परंतु आज ना उद्या हा प्रतिस्पर्धी पराभूत होणारच आहे आणि आपले खरे प्रतिस्पर्धी पुनः जोमाने स्पर्धेत उतरणार आहेत. त्यावेळी तुम्ही किती “तयार” आहात यावर तुमच्या बिझनेसचं भविष्य अवलंबून असणार आहे!

४. बिझनेसशी संलग्न असलेल्या इतर संकटांची वा संधीची पडताळणी
आपला ब्रॅंड उभा करणे, व्यवसायाला अधिकाधिक प्रॉफिटेबल करणे या आणि अश्याच इतर अनेक फ्रन्टवर रोज लढत असताना, बदलत्या बिझनेस लॅंडस्केप कडे लक्ष देणं राहून जातं. फक्त आपलीच इंडस्ट्री नव्हे – आपल्या इंडस्ट्रीशी संलग्न असलेल्या (वा नसलेल्या देखील!) इतर बिझनेसेस चे आपल्या व्यवसायावर होणारे परिणाम अनेकदा आपल्याला थांबवता येत नसतात. 

मोबाईल मध्ये कॅमेरा आला आणि जगभरातील प्रेक्षणीय स्थळांवर फोटो काढून देण्याचा व्यवसाय करणाऱ्या लक्षावधी लोकांसमोर अस्तित्वाची लढाई उभी राहिली! कम्प्युटर – प्रिंटर जोडगोळीने टाईपरायटर हा प्रकारच इर्रिलेव्हंट करून टाकला! अश्यावेळी हवेच्या बदलत्या रोखाची लवकरात लवकर कल्पना येईल – तोच बिजनेसमन तरुन जातो. बहुतेकवेळा केवळ तरत नाही, उंचावर पोहोचतो!

कोरोना संकटाच्या काळात असे विविध स्पष्ट – अस्पष्ट बदल शोधणे, अभ्यासणे हा दैनंदिन दिनक्रमाचा भाग केला तर बिझनेस दुप्पट, तिप्पट, चौपट - अगदी दसपट गतीनेदेखील पुढे नेणं शक्य होऊ शकेल!

५. डिजिटल बिझनेस
लास्ट – बट ऑफ कोर्स – नॉट द लीस्ट!
“डिजिटल युगात तुमचा बिझनेस डिजिटल केल्याशिवाय गत्यंतर नाही” हे वाक्य जवळजवळ सरधोपट झालं आहे! पण किती बिझनेसमन हे वाक्य गांभीर्याने घेऊन आपल्या ब्रॅंडला तसं रूप देतात? किती व्यवसायांची वेबसाईट अद्ययावत असते? किती व्यवसाय विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्स वर स्वतःला सक्षमरित्या ग्राहकांसमोर उभे करत आहेत? किती व्यवसायांची डिजिटल मार्केटिंग फनल तयार आहे? असे प्रश्न विचारल्यास कितीतरी मराठी उद्योजक नकारात्मक माना डोलावतील! कारण काही का असेना – डिजिटल त्सुनामीत कित्येक उद्योजक मागे पडत आहेत हे सत्य आहे. ते सत्य बदलण्याची संधी, प्रत्येक उद्योजकाला या लॉकडाऊनमध्ये मिळाली आहे! बस्स, तुमची स्वतः या संधीचं सोनं करता का – यावरच सगळं काही अवलंबून आहे. सेवाहच्या सायन्स अँड सक्सेस या प्रोग्राममध्ये वरील ५ आणि अश्याच इतर अनेक महत्वपूर्ण टिप्स वर काम केलं व करून घेतलं जातं! सेवाहच्या चेअरपर्सन सौ अश्विनी धुपे प्रत्येक उद्योजकाला या सर्व बेस्ट प्रॅक्टिसेसवर अमलबजावणी करण्यात मदत करत असतात. महत्वाची बाब म्हणजे, केवळ टिप्स देणे, आराखडा आखून देणे – इथेच नं थांबता, सेवाह च्या नवरत्न कंपनी द्वारे या सर्वच बाबींची अमलबजावणी करून दिली जाते!

कोरोना काळात अनेक अडथळे, अडचणी समोर उभ्या आहेत. पण प्रत्येक उद्योजकला मनातून हे माहिती असतंच की कोरोना असो नसो, रोज अश्या अडचणी उभ्या रहाणारच आहेत. त्या अडचणींचं संधीत रूपांतर कसं करता येईल यावर सतत विचार करेल – तोच उद्योजक यशस्वी होत असतो! सेवाह असेच यशस्वी उद्योजक घडवण्याच्या ध्येयावर काम करत आहे...आणि हजारो यशस्वी उद्योजक घडवत आहे!

-
www.ashwinidhuppe.com

Comments (1)
profile image
Avanti

Good information 👍

Reply
Leave A Comment